घरी राहुन शिक्षण ( Learning From Home) ही संकल्पना राबविण्यासाठी खालील संसाधनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे

संदर्भ : शासन परिपत्रक क्रमांक:2020/प्र. क्र.84 /एस.डी.-6
दिनांक : 28 एप्रिल 2020

Diksha for mobile

खालील Image ला क्लिक करा.

       DIKSHA: प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी यांना मोफत आणि मुबलक प्रमाणात ई-लर्निग साहित्य मिळा वे म्हणून केंद्र शासन MHRD) आणि महाराष्ट्र शासनाने DIKSHA ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. DIKSHA वर सद्य:स्थितीमध्ये इयत्ता १ ली ते १०वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधील ९००० पेक्षा अधिक ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे. या वर उपलब्ध ई-साहित्यामध्ये प्रामुख्याने इंटरेक्टिव व्हिडिओ, संकल्पनेवर आधारित व्हिडिओ, उपक्रमावर आधारित व्हिडिओ, बौद्धिक खेळ स्वरुपातील गेम्स, विविध वर्कशिट, इंटरैक्टिव प्रश्नपेढी इत्यादींचा समावेश आहे.
       महाराष्ट्रातील शिक्षकांनी देखील DISKHA वरील ई-साहित्याची निर्मिती केली आहे. DIKSHA वरील उपलब्ध ई साहित्याचा वापर करून विद्यार्थी घरबसल्या आपले अध्ययन सुरू ठेवू शकतात तसेच पालक याचा वापर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊ शकतात.

Diksha web portal

खालील Image ला क्लिक करा.

       इयत्ता १ ली ते १०वी साठीचे DIKSHA वेब पोर्टल : संगणक व लॅपटॉप वर देखील DIKSHA मधील ई-साहित्य पाहण्यासाठी DIKSHA वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यात इयत्ता १ ली ते १० वी च्या सर्व विषयांचे ई-साहित्य पाहता येते. DIKSHA वेब पोर्टल वर ई-साहित्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Creative Thinking

खालील Image ला क्लिक करा.

       क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग (सीसीटी) प्रश्न : इयत्ता आठवी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन, गणित आणि विज्ञान साक्षरतेवरील CCT आठवड्यातून DIKSHA वर अपलोड केल्या जातात.CCT सरावासाठी नवीन प्रश्न दर सोमवारी अपलोड केले जातात आणि गुरुवारी उत्तरे दिली जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार कौशल्य निर्माण करण्याची चांगली संधी उपलब्ध होते.CCT मार्फत सदर उपक्रम इतर इयतांसाठी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ई-बालभारती

खालील Image ला क्लिक करा.

       ऑनलाईन पाठ्यपुस्तके: इ.१ ली ते १२ वी साठीची सर्व पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्यासाठी बालभारती वेबसाईट - www.ebalbharati.in या संकेतस्थळावर जाऊन PDF BOOKS DOWNLOADING मधून इयत्ता १ ली ते १० वीची राज्य अभ्यासक्रमावरील एकूण दहा भाषा माध्यामातील पाठ्यपुस्तके PDF स्वरूपात डाऊनलोड करावी. तसेच इयत्ता ११ वी व १२ वी ची मराठी आणि इंग्रजी या भाषा माध्यमातील PDF स्वरूपातील पाठ्यपुस्तके डाऊनलोड करावी. पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.

बोलकी पुस्तके

App डाऊनलोड करण्यासाठी खालील Image ला क्लिक करा.

बोलकी बालभारती (Talking Books): ई- बालभारतीच्या माध्यमातून इयत्ता ८ वी ते १० वी च्या दिव्यांग (दृष्टी संदर्भात) तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाची सर्व भाषा विषयांची Talking Books तयार करण्यात आली आहेत. ती ऑडीओ स्वरूपात असल्याने करता येईल. त्यासाठी पुढील लिंक वापरावी. https://learn.ebalbharati.in/ किंवा येथे क्लिक करा..